तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यात सर्वात मोठी व प्रतिष्ठेची ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अणदूर ग्रामपंचायत अंतर्गत मधुशाली नगरमध्ये सुविधा अभावी नागरिकांना नाक दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत आहे. ग्रा.पं.च्या या भोंगळ कारभारामुळे प्रचंड संताप व चीड व्यक्त केला जात आहे. ग्रामपंचायत व संबंधितानी पाण्याच्या निचऱ्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची एकमुखी मागणी केली जात आहे.
जवळपास तीस हजार लोकवस्तीचे शहर असून बस स्थानकासमोर मधुशाली नामक प्रतिष्ठित व नोकरदारांची गेल्या अठरा वर्षापासून वस्ती म्हणून परिचित आहे. या वस्ती लागतच जवाहर महाविद्यालय, घुगे वस्ती व राष्ट्रीय महामार्ग असून या वस्तीत ना रस्ता-ना गटारी सर्वत्र घाणीचे, दलदरलीचे, चिखलमय अवस्था पहावयास मिळते. यामुळे अनेक लहान मोठ्या मुलांना आजाराने वेढले असून या वस्तीकडे ग्रामपंचायतचे अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांचे बेहाल होत असल्याच्या तक्रारी असून तुळजापूर तालुक्याचे विकासभिमुख आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जातीने लक्ष घालून नागरिकांच्या समस्याकडे लक्ष देण्याची एकमुखी मागणी केली जात आहे.
आ. पाटील यांनी सहा वर्षाच्या कारकिर्दीत अनेक प्रश्न मार्गी लावली असून बसस्थानक ते खंडोबा मंदिर मुख्य रस्त्याच्या कामासाठी जवळपास दोन कोटीचा निधी दिल्याने गावच्या विकासात भर पडली असून त्याचे काम ही प्रगतीपथावर आहे. मधुशाली नगर मधील रस्ता व गटारीचे काम आमदार निधीतून देण्याची मागणी आहे रहिवाशातून केली जात आहे.
या मधुशाली वस्तीमध्ये राष्ट्रीय महामार्ग, जवाहर कॉलेज व घोडके डोंगराचे संपूर्ण पाणी वस्तीमध्येच घुसत असल्यामुळे रस्त्यात पाणी की पाण्यात रस्ता आशी केवलवाणी अवस्था निर्माण झाल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. संबंधितानी मधुशाली नगर मधील नागरिकांच्या अडचणी व समस्या लक्षात येऊन तातडीने मार्ग काढण्याची मागणी केली जात आहे.
खासदारांच्या प्रयत्नांना ब्रेक
धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी डॉ. जितेंद्र कानडे, बाळकृष्ण घोडके पाटील यांच्या उपस्थितीत पाहणी करून राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांना पाण्याच्या विल्हे वाटीसाठी सूचना व तरतूद केली होती. एवढेच नव्हे तर पाईप लाईन साठी पाईपही टाकले होते, मात्र घोडे कुठे आढले असा संतप्त सवाल ऐकावयास मिळत आहे.
मधुशाली नगर मधील पाण्याच्या निचऱ्याची बिकट अवस्था लक्षात घेऊन खा. ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः जातीने लक्ष घालून राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिली असून कामाला सुरुवात ही झाली होती, मात्र स्थानिक काही लोकांच्या असहकार धोरणामुळे कामाला ब्रेक लागला असून नागरिकांच्या हितासाठी स्थानिकांनी सहकार्य केल्यास प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास ग्रामपंचायतचे जेष्ठ सदस्य डॉ. जितेंद्र कानडे यांनी व्यक्त केला.
Leave a reply













