श्रीरामपूर ( प्रतिनिधी ) : आज दिनांक ०२/०९/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत छापा टाकून तीन संशयितांना पकडण्यात यश मिळविले आहे.पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ. १४८५ पंकज व्यवहारे, पोहेकॉ. १७३३ अतुल लोटके, पोहेकॉ. ८१४ उमेश खेडकर, पोहेकॉ.९११ दिगंबर कारखेले व पोहेकॉ. ८०३ मल्लिकार्जुन बनकर, पोहेका दिपक घाटकर, पोहेकाँ फुरकान शेख, पोकाँ प्रशांत राठोड, पोकाँ विशाल तनपुरे, चास. फौ उमाकांत गावडे, यांनी पथकासह रेल्वे उड्डाणपुलाजवळ, हरेगाव फाटा, ता. श्रीरामपूर येथे सापळा रचून कारवाई केली. छाप्यात खालील आरोपी ताब्यात घेण्यात आले-
१) अक्षय उर्फ भावड्या संजय माळी, वय २३ वर्षे, रा. फत्तेपुर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर
२)अजय शिवाजी मगर, वय २५ वर्षे, रा. नांदुर शिखरी, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर
३)योगेश मच्छिंद्र निकम, वय ३५ वर्षे, रा. वडगांवगुप्ता, ता. नगर, जि. अहिल्यानगर ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला -एकूण ५ गावठी पिस्टल (अग्निशस्त्र) ९ जिवंत काडतुसे, पल्सर मोटारसायकल क्र. एमएच १७ डीजी ५७६७ असा
एकूण मुद्देमाल किंमत – ४,०९,०००/- रुपये
प्राथमिक चौकशीत आरोपींकडील शस्त्रे विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपीविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुर.नं ८१८/२०२५भारतीय हत्यार कायदा १९५९ कलम ३/२५, ७/२५प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हि कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेची श्रीरामपूर येथे मोठी कारवाई, पाच गावठी पिस्टल, नऊ जिवंत काडतुसासह तीन आरोपी ताब्यात

0Share
Leave a reply












