SR 24 NEWS

अपघात

नगर-मनमाड महामार्गावर कंटेनर व दुचाकीचा भीषण अपघात,  वडनेर येथील ३१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Spread the love

राहुरी (प्रतिनिधी) : नगर-मनमाड महामार्गावर पुन्हा एकदा मृत्यूचा थरकाप उडवणारा अपघात घडला आहे. राहुरी कृषी विद्यापीठ परिसरात आज (मंगळवार) सकाळी साडेआठच्या सुमारास अहिल्यानगर  दिशेने जात असलेल्या कंटेनरने  दुचाकीस्वारास  पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात ज्ञानदेव पाटीलबा बलमे (वय ३१, रा. वडनेर, ता. राहुरी) या तरुणाच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेल्याने या  तरुण जागीच मृत्यू झाला.

ज्ञानदेव बलमे हे  अहिल्यानगर  एम.आय. डी. सी येथे एका कंपनीत  कामावर जात असताना हा अपघात घडल्याची  माहिती मिळाली आहे.  सदरील तरुण दररोज वडनेर ते अहिल्यानगर  येथील एम.आय. डी. सी   येथे  एका कंपनीत  अपडाऊन करत असत परंतु आज सकाळी हा ज्ञानदेव बलमे तरुण  नेहमीप्रमाणे  आपली दुचाकी क्रमांक MH. 17.DK. 1931 वरून  कामावर जात असताना  हा दुर्दैवी अपघात घडला.  रस्त्याला खड्डे असल्याने  या दुचाकी स्वराने  आपला वेग कमी केला असता मागील येणाऱ्या   RJ. 14. GK. 8730  या  क्रमांकाच्या कंटेनर चालकाने या तरुणाच्या दुचाकीस पाठीमागून धडक दिली तो तरुण कंटेनरच्या चाका खाली सापडला  गेल्याने त्या तरुण जागीच मृत पावला. या कंटेनर चालकास विद्यापीठ सुरक्षा  सुपर वायझर  दत्तात्रय अडसूरे यांनी वेळीच ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. अवघ्या ३१ व्या वर्षी  या  तरुणावर काळाने घाला घातल्याने त्यांच्या कुटुंबावर व परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या तरुणाच्या पश्चात त्याचे आई, वडील पत्नी व एक वर्षाची मुलगी असल्याची माहिती  समोर आली आहे. 

यापूर्वी केवळ दोन दिवसांपूर्वीच जगधने नावाच्या महिलेचा याच महामार्गावर अपघातात मृत्यू झाला होता. त्या महिलेच्या  संतप्त नातेवाईकांनी रास्ता रोको करून महामार्ग रोखला होता. चार दिवसांत दोन निरपराध लोकांचा बळी गेल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत, त्यामुळे या महामार्गावर होणाऱ्या अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. यापूर्वीही असंख्य तरुणांना या मार्गावर आपले प्राण गमवावे लागले आहेत.

या सततच्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. “नगर-मनमाड महामार्ग आणखी किती बळी घेणार?” हा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने या महामार्गावर रस्त्यांची दुरुस्ती व सुरक्षिततेची पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.ज्ञानदेव बलमे यांच्या निधनाने वडनेर परिसरात शोककळा पसरली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!