SR 24 NEWS

इतर

पत्रकारावरील अन्याय व खोट्या कारवाईची , चौकशी करून न्याय देण्याची मागणी

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : पत्रकारावरील होणाऱ्या अन्याय, धडपशाही व खोट्या कारवाई संदर्भात तात्काळ चौकशी करून लोकशाहीचा चौथा खांब म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पत्रकारांना खऱ्या अर्थाने न्याय व संरक्षण देण्याची मागणी अणदूर पत्रकारांनी एका निवेदनाद्वारे 31 ऑगस्ट रोजी नळदुर्ग पोलिसांना दिली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, अनेक वर्षापासून समाजातील घडामोडी, जनहिताचे प्रश्न, शासनाच्या विविध योजनांची माहिती, भ्रष्टाचार, अवैध आदी विषयासह अंकुश ठेवून न्याय देण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र अलीकडच्या काळात पत्रकारावर अन्याय होताना दिसतो. काही दिवसापूर्वी धाराशिव लाईव्ह चे संपादक सुनील ढेपे, भूम येथील इंद्र मनी गायकवाड यांच्यावर आकाश बुद्धिने खोटे गुन्हे दाखल केले आहेत.

पत्रकारावरील होणाऱ्या अन्याय धमक्या व खोट्या गुन्ह्याचे तात्काळ चौकशी करून पत्रकार संरक्षण कायद्याचे अंमलबजावणी करून पत्रकारांना संरक्षण देवून धमक्या देणाऱ्यांना कडक शासन करण्याची मागणी केली आहे.

या निवेदनावर सचिन तोग्गी, दयानंद काळुंके, शिवशंकर तिरगुले, संजीव आलूरे, चंद्रकांत गुड, प्रसन्न कंदले, श्रीकांत अणदूरकर, लक्ष्मण नरे, दिनेश सलगरे, गायकवाड, शिवाजी कांबळे यांच्यासह पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!