SR 24 NEWS

सामाजिक

स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्था व महा एनजीओ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण पूरक रक्षाबंधन साजरा

Spread the love

इंदापूर तालुका प्रतिनिधी / प्रविण वाघमोडे : महा एनजीओ फेडरेशन आणि ISO प्रमाणित स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्था मदनवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळावर दिनांक 26/08/2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मदनवाडी येथे रक्षाबंधना चा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये गो – मातेच्या शेणा पासून निसर्ग पूरक बनविलेल्या राख्या वापरण्यात आल्या या राख्यामुळे निसर्गामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही. याचे महत्त्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले व ही राखी बनवताना कोण कोणते घटक वापरले याची ही कल्पना दिली.

महा एनजीओ फेडरेशन ची संकल्पना लक्षात घेऊन रक्षाबंधन निमित्त राखी बांधण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमांमध्ये शाळेतील मुलींनी व संस्थेच्या महिला सदस्यांनी विद्यार्थ्यांना तसेच शाळेतील शिक्षकांना राख्या बांधल्या व बहिण भावाच्या या पवित्र नात्याचा आनंद घेतला.

सदर कार्यक्रमांमध्ये मुख्याध्यापक दिलीप बनकर सर , प्रमोद कुमार कुदळे सर, प्रकाश वाघ सर,राम वणवे सर व संस्थेचे अध्यक्ष सुरज सोट पाटील,सचिव धिरज सोट पाटील,महिला प्रतिनिधी सोनाली चोपडे व शामल सोट पाटील आदी मान्यवर उपस्थित होते .सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी व शिक्षक यांनी परिश्रम घेतले. व शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता केली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!