SR 24 NEWS

इतर

मुळा धरणातून आज 1500 क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात येणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आवाहन

Spread the love

राहुरी (सोमनाथ वाघ) : मुळा धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाल्यामुळे शुक्रवार, दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3.00 वाजता धरणातून मुळा नदीपात्रात 1500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. मुळा धरणाची एकूण साठवण क्षमता 26 टीएमसी (26,000 दलघफु) असून, सध्या धरणातील एकूण साठा 25,000 दलघफु इतका झाला आहे. मुळा धरणाच्या जलाशय परिचालन सूची (ROS) नुसार 1 ते 15 जुलै दरम्यान Lower Guide Curve नुसार 24,242 दलघफु व Upper Guide Curve नुसार 24,885 दलघफु एवढा साठा नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार साठ्यातील वाढ लक्षात घेता विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आपत्कालीन परिस्थितीत नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग टप्याटप्याने वाढविण्यात येईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता सायली पाटील (मुळा पाटबंधारे विभाग, अहिल्यानगर) यांनी दिली.दरम्यान, मुळा नदीकाठच्या गावांना आवाहन करण्यात आले आहे की, नदीपात्रातील चल-मालमत्ता, पशुधन, शेती अवजारे, वाहने आणि इतर मनुष्य उपयोगी साहित्य सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे. तसेच नागरिकांनी नदीपात्रात प्रवेश करु नये व जीवित किंवा वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!