तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, तुर, कांदा सह सर्व हाता तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून गेल्याने शेतकरी अस्मानी संकटात सापडला असून मुख्यमंत्र्यांनी बाधित शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये मदत देण्याची मागणी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्याकडे 18 ऑगस्ट रोजी निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे चोहो बाजूने कोंडी झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची खऱ्या अर्थाने गरज आहे. खरीप हंगाम पूर्णतः हातचा गेल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून खरीप हंगाम पूर्णतः हातचा गेला आहे. शेतकऱ्यांची अवस्था केविलवाणी झाली असून उत्पन्नसुन्न झाल्याने कर्जाच्या खाईत सापडला असून त्याला तातडीने मदतीची आवश्यकता आहे.
खरीप तर गेले रब्बीचे कसे करायचे या प्रश्नाने शेतकरी हातभार झाला असून त्याला सावरण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी ही जिल्हाधिकारीकडे निवेदनाद्वारे केली आहे. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी मुख्यमंत्र्याकडे खरीप हंगामाची कैफियत मांडल्याने रब्बी हंगामासाठी पंचनामाचा देखावा न करता सरसकट पन्नास हजाराची मदत देण्याची मागणी केली आहे त्यामुळे शेतकऱ्याचा समाधान व्यक्त केले जात आहे.
धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना, सरसकट पन्नास हजार मदत देण्याची माजी मंत्री मधुकर चव्हाण यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

0Share
Leave a reply












