SR 24 NEWS

इतर

वन विभागातील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी,वन अधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराचा गंभीर आरोप; 14 ऑगस्टपासून मुख्य वनसंरक्षक कार्यालया समोर आंदोलन पेटणार

Spread the love

सोनई प्रतिनिधी /  मोहन शेगर :  अहिल्यानगर वन विभाग येथील उपवनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी व सहाय्यक वनसंरक्षक यांनी संगणमताने गैरव्यवहार व भ्रष्टाचार केल्याचा आरोप करुन याप्रकरणी स्वतंत्र यंत्रणेमार्फत निपक्ष चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे अन्याय भ्रष्टाचार निवारण जनहित समितीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याप्रकरणी कारवाई न झाल्यास 14 ऑगस्ट पासून नाशिक येथील मुख्य वनसंरक्षक यांच्या कार्यालया समोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष मीनहाज शेख यांनी दिला आहे.

अहिल्यानगर वन विभागात सुरु असलेल्या गैरव्यवहार व भ्रष्टाचार प्रकरणी अनेक वेळा तक्रार व पत्रव्यवहार करून देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आलेले आहे. उपवनसंरक्षक कार्यालयातील हॉल, केबिन, त्यांचे निवासस्थान, विश्रामगृह व इतर इमारतीचे बांधकाम, नूतनीकरण, दुरुस्ती फर्निचर, रंगकाम इत्यादी दोन वर्षांपूर्वी झाले आहे. मात्र तेथे पुन्हा सप्टेंबर 2024 ते जुलै 2025 नवीन निकृष्ट दर्जाचे कामे करून त्याचे बिले काढण्यात आलेली आहे. सावेडी उपनगर परिसरातील वन जमिनीवर अधिकारी यांच्या मूळ संमतीने झालेले विविध अतिक्रमणे यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

नगर व नेवासा तालुक्यात एकूण 61 आरागिरणी (सॉ मील) चालू आहे. त्याचे अवैध लाकूड वाहतूक, लाकूड व्यापारी, चंदन तेल कंपनी, चंदन तस्करी, वन्य प्राणी तस्कर कडून दरमहा होणारी हप्तेखोरी राजरोसपणे चालू आहे. शहरातील गंजबाजार मधील आयुर्वेदिक, वनऔषधी विक्रेत्यावर ऑक्टोंबर 2024 मध्ये चंदन तेल लाकूड, इत्यादी वनौषधी वनस्पती जप्त केल्याचा फक्त देखावा केला असून, संबंधित आरोपीस अटक केली नाही. यामध्ये मोठी तडजोड करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.माथणी (ता. नगर) येथे 30 मे रोजी बिबट्याची हत्या झाली. आरोपीने तस्करीच्या उद्देशाने बिबट्याचे अवयव काढून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यात मोठी गंभीर घटना घडली आहे. संबंधित तपास अधिकारीने आरोपीची कशी सुटका होईल यासाठी प्रयत्न केले आहे.

मौजे मांजरसुंबा येथे अधिकारीने स्वतःचे फायद्यासाठी वादग्रस्त जमिनीवर चालू असलेले वन पर्यटन विकास योजनेचे निकृष्ट कामांचे बिले काढलेले आहे. असे एकूण 11 मुद्द्यांवर चौकशी व कारवाई होत नसल्याने उपोषण करण्याचा पवित्रा अन्याय भ्रष्टाचार निवारण जनहित समितीच्या वतीने घेण्यात आला आहे.यासाठी जिल्हा उपाध्यक्ष शन्नूबाई पठाण, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब थोरात, जिल्हा सचिव समीर शेख, सुखदेव होले, यमुनाताई भालेराव, पाशाभाई शेख, रुपेश उघडे, रवींद्र भवरे, बाबासाहेब गायकवाड, सुनील काळोखे, कलीमभाई पठाण, अक्रम कुरेशी, हुसेन शेख, शब्बीर कुरेशी आदी प्रयत्नशील आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!