शनी शिंगणापूर (प्रतिनिधी ) : शनैश्वर देवस्थानच्या अर्थिक घोटाळ्याची चौकशी युद्धपातळीवर सुरु होताच देवस्थानचे कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांच्या आत्महत्याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. अशातच या देवस्थानमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून वॉचमेन असलेल्या दुसऱ्या कर्मचाऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
त्यामुळे आता पुन्हा एकदा शनिशिंगणापूरसह नेवासा तालुका या आत्महत्याच्या कारणाने चांगलाच हादरला आहे. या वॉचमेनची आत्महत्या नेमकी का? घडली याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. या प्रकरणाची गंभीर दखल सोनई पोलीसांनी घेतली असून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या आत्महत्या प्रकरणाचे गुढ बाहेर काढण्याठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.
या देवस्थानचा कंत्राटी कामगार असलेल्या शुभम विजय शिंदे (वय २२) रा. बेल्हेकरवाडी (ता. नेवासा) या कर्मचाऱ्याने बुधवारी दुपारी त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे शनिशिंगणापूरसह तालुक्यात प्रचंड खळबळ उडालेली आहे. एका मागोमाग एक झालेल्या आत्महत्येच्या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडालेली आहे. याबाबत दत्तात्रय आप्पासाहेब शिंदे यांनी दिलेल्या माहितीवरून सोनई पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.
याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, मृत शुभम शिंदे यांचे आई वडील शेतात कामाला गेलेले असताना दुपारी चार वाजेण्याच्या सुमारास त्याने त्याच्या घरात्या घरी पत्र्याच्या खोलीत गळफास घेतला. ही घटना शेजारील मुलांच्या निदर्शनास आली असता त्यांनी ही माहिती परिसरातील नागरिकांन सांगितली. यानंतर घटनास्थळी पोलिसही दाखल झाले ‘त्या’ नंतर मृत शुभम शिंदे याच्या मृतदेहाचे नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरनिय तपासणीसाठी शवविच्छेदन करण्यात आले.
दरम्यान, शिंगणापूर देवस्थानवर विविध घोटाळ्यांचे उघड अर्थिक आरोप होत असताना हे देवस्थान राज्यात चांगलेच चर्चेत आले आहे. ही चौकशी सुरू असतानाच या देवस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना तसेच त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसताना शुभम शिंदे या कंत्राटी कर्मचाऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केली आहे.
मृत शिंदे हा कर्मचारी या देवस्थानमध्ये कंत्राटी कामगार म्हणून नियुक्त होता. त्याने देवस्थानमध्ये गोशाळा, भक्तनिवास विभागातही काम केलेले होते. सध्या हा कर्मचारी काही दिवसांपासून कामावर जात नव्हता. त्यामुळे त्याने ही आत्महत्या नेमकी का केली? याचा तपास सध्या पोलीस युद्धपातळीवर करण्यासाठी सक्रिय झालेले आहेत. मात्र, एका मागोमाग एक आत्महत्या या देवस्थानच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याने केल्यामुळे या आत्महत्या प्रकरणातील नेमके गुढ काय? बाबत पोलीसांनी तपासाचे चक्रे वेगाने फिरवत आहेत.
शनिशिंगणापूर देवस्थान मध्ये खळबळ ! कार्यकरी अधिकाऱ्यानंतर आणखी एका कंत्राटी कर्मचाऱ्याची आत्महत्या,

0Share
Leave a reply












