SR 24 NEWS

क्राईम

घारगाव येथे पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरुन कुर्‍हाडीने वार करत पतीने केला पत्नीचा खून

Spread the love

संगमनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने कुर्‍हाडीने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.31) पहाटे घडली आहे. याप्रकरणी घारगाव पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, घारगावमधील खंदारे वस्ती येथील चंद्रकला दगडू खंदारे (वय 60) यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती दगडू लक्ष्मण खंदारे (वय 65) याने कुर्‍हाडीने पत्नीच्या डोक्यावर वार करुन खून केला.

याप्रकरणी मुलगा भीमा दगडू खंदारे (वय 40) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी आरोपी पती दगडू खंदारे याच्यावर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 103 (1) नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच घारगावचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी फौजफाट्यासह तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीस ताब्यात घेत अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.

तसेच संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनीही घटनास्थळी जावून पाहणी केली आहे. या घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक थोरात हे करत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!