SR 24 NEWS

इतर

बनावट नोटा प्रकरणाचा पर्दाफाश करणाऱ्या राहुरी पोलिसांचा विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याहस्ते गौरव

Spread the love

राहुरी (प्रतिनिधी) : बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या राहुरी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचा विशेष पोलीस महानिरीक्षक मा. दत्तात्रय कराळे (नाशिक परिक्षेत्र, नाशिक) यांच्या हस्ते नुकताच गौरव करण्यात आला.या गौरव समारंभात अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बनावट नोटांच्या बाबतीत तांत्रिक तपास, गुप्त माहिती संकलन व अचूक कारवाई करून संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करणाऱ्या अधिकाऱ्यांचे हे विशेष कौतुक करण्यात आले.

राहुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस अंमलदारांनी परिश्रमपूर्वक व धाडसी कारवाई करून मोठ्या प्रमाणात बनावट चलन जप्त केले. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये पोलीस दलाविषयी विश्वास व सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या यशस्वी कारवाईबद्दल अधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे यांनी म्हटले की, “अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलीस खात्याची दक्षता व तत्परता अत्यंत महत्त्वाची असते. राहुरी पोलीस ठाण्याने जे धाडस व सतर्कता दाखवली, ती अन्य पोलीस ठाण्यांसाठीही प्रेरणादायी आहे.”

 विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे यांनी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या उपस्थितीत बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे  राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे , गुन्हे शोध पथक पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे , पोलीस अंमलदार विकास साळवे , सुरज गायकवाड, राहुल यादव , अंकुश भोसले , नदीम शेख , प्रमोद ढाकणे , सतीश कुराडे , इत्यादींचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला .

 


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!