तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : अणदूरचे सुपुत्र तथा सांगोला पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचा सोलापूरचे ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या हस्ते यात्रा काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन कौतुक केले जात आहे.
सांगोला पोलीस स्टेशनचे कर्तबगार वरिष्ठ पोलीस अधिकारी विनोद घुगे यांनी आषाढी वारी काळात पंढरपूर या ठिकाणी विशेष कार्य सेवा बजावली. वेगळा आदर्श निर्माण केल्याने त्यांना गौरवण्यात आले. घुगे हे काळ्याधंदाचा कर्दनकाळ, शिस्तप्रिय अधिकारी, सर्वसामान्यांना न्याय देणारा अधिकारी अशी त्यांची विशेष ओळख आहे. त्यांना विशेष प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत असून अणदूर येथे ही अभिनंदन व कौतुक केले जात आहे..
अणदूरचे सुपुत्र व सांगोल्याचे पोलीस निरीक्षक ,विनोद घुगे यांचा विशेष सन्मान अणदूर मध्ये आनंदोत्सव

0Share
Leave a reply












