अहिल्यानगर : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने हैदराबादमधून एका संशयितास अटक केली आहे. संशयित आरोपी अनिस महमद हनीफ शेख (मूळ रा. चकलांबा, ता. आष्टी, जि. बीड) हा सध्या नारेगाव, संभाजीनगर येथे वास्तव्यास असून त्याला निजामाबाद (ता. धगगी) येथून अटक करण्यात आली.ही धमकी आमदार संग्राम जगताप यांचे स्वीय सहाय्यक सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेजद्वारे देण्यात आली होती. “संग्राम को दो दिन के अंदर खत्म करुंगा” असा थेट इशारा देण्यात आला होता. त्यामुळे राजकीय आणि पोलिस वर्तुळात खळबळ उडाली होती.
स्वीय सहाय्यकाच्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळी मोबाईल क्रमांकाचा तपास करत स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून हैद्राबाद येथे सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले.दरम्यान, आमदार संग्राम जगताप हे गेल्या काही काळापासून हिंदुत्ववादी भूमिकेमुळे चर्चेत आहेत. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते वारंवार प्रकाशझोतात आले आहेत. अशा पार्श्वभूमीवर मिळालेली ही धमकी अधिक गंभीर मानली जात आहे. आरोपीचा मोबाईल फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आला असून, या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे
Leave a reply













