एसआर 24 न्यूज़ राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पेट्रोल पंपाजवळ आज शुक्रवार रोजी दुपारी 12 : 50 वाजता कंटेनर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात राहुरी कृषी विद्यापीठ येथे शिक्षण घेत असलेल्या पुण्यातील तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुचिता आधाटे (वय अंदाजे २८, रा. पुणे) असे तिचे नाव असून, ती कृषी विस्तार विभागात पीएच.डी. तृतीय वर्षाच्या अंतिम सत्रात शिक्षण घेत होती. याच महिन्यात 8 जून रोजीच या तरुणीचा विवाह झाला होता, अशी माहिती समोर आली आहे.
सदरील ट्रक नगरहुन राहुरीच्या दिशेने जात असताना दुचाकीला (MH 14 LN 2809) भरधाव कंटेनर (TN DX 3157) ने जोरदार धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली. अपघाताची माहिती मिळताच विद्यापीठ सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांच्या नेतृत्वाखाली डी.एन. जाधव, जयेश पवार, अमोल दिवे, गणेश पर्वत, अनिल नजन, रविराज काळे तसेच महिला सुरक्षा रक्षक पूजा पवार आणि वर्षा नेहे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी अपघातग्रस्त तरुणाची परिस्थिती पाहता वेळेची तत्परता दाखवत जखमी तरुणीला तातडीने आपल्या शासकीय वाहनातून महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने अहिल्यानगर येथे उपचारासाठी हलविले, मात्र अहिल्यानगर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्या अपघातग्रस्त तरुणीचा तिचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे विद्यापीठ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक गणेश सानप यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून, अपघाताचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत.तसेच विद्यापीठ परिसरात गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ पेट्रोल पंपाजवळ कंटेनर- दुचाकीचा भीषण अपघात विद्यापीठ येथे शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा मृत्यू ; विद्यापीठ परिसरात शोककळा

0Share
Leave a reply












