SR 24 NEWS

सामाजिक

पत्रकार वसंत रांधवण यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्कार जाहीर ; पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते होणार पुरस्काराचे वितरण

Spread the love

एसआर 24 न्यूज़ प्रतिनीधी / रमेश खेमनर  : तालुक्यातील टाकळीढोकेश्वर येथिल रहिवासी पारनेर चे भूमिपुत्र तसेच एसआर 24 न्यूज़ मिडियाचे व दैनिक अक्षराज चे अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पारनेर तालुका उपाध्यक्ष वसंत रांधवण यांना जय युवा अकॅडमी व जय असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्याच्या वतीने दरवर्षी होणाऱ्या सावित्री ज्योती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्कार २०२५ जाहीर करण्यात आला असून, सावित्री ज्योती महोत्सव पुरस्कार निवड समितीचे प्रमुख मान्यवरांनी वसंत भानुदास रांधवण यांना निवडीचे पत्र देऊन कळवीले आहे.

रविवार दि. १२ जानेवारी रोजी अहमदनगर शहरातील सावेडी रोड येथील कोहिनूर मंगल कार्यालयात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी पद्मश्री पोपटराव पवार, खासदार निलेश लंके, समाजकार्य महाविद्यालयाचे डॉ. सुरेश पठारे, पुणे येथील ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. प्रशांत साळुंके,सुहासराव सोनवणे,लावणी सम्राज्ञी रोहिणी थोरात, स्वागताध्यक्ष किशोर डागवाले या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्कार २०२५ देऊन वसंत रांधवण यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

पत्रकारिता क्षेत्रात गेल्या काही वर्षांतील सातत्यपूर्ण कामगिरी व १६ वर्षापासून सातत्याने सामाजिक कार्य केल्याबद्दल आम्ही सावित्री ज्योती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वसंत रांधवण यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्कार २०२५ जाहीर करण्यात आला असल्याचे मुख्य संयोजक ऍड. महेश शिंदे,प्रा. सुनील मतकर, भीमराव उल्हारे, शिवाजी नवले, आरती शिंदे, रावसाहेब काळे, विनोद साळवे, निलेश रासकर, रावसाहेब मगर यांनी सांगितले आहे.
सावित्री ज्योती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर समिती दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येते असल्याचे गणेश बनकर यांनी सांगितले.
हा पुरस्कार जाहीर जाहीर झाल्याबद्दल पारनेर तालुक्यासह जिल्ह्यांतील पत्रकारांनी, सामाजिक, राजकीय क्षेत्रांतील मान्यवरांकडून वसंत रांधवण यांचे अभिनंदन होत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!