संगमनेर प्रतिनीधी / धनेश कबाडे : सध्याची विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे .त्यातच नागरिकांना योजना आणि आश्वासन नको पण कार्यकर्ता आवर अशी स्थिती निर्माण झाली आहे . काही कार्यकर्ते पक्षाच्या काही प्रमुख नेत्यांच्या पुढे पुढे करून पदे मिळवतात. त्यात सध्या जे पद तालुक्यात एकाला देले जाते ते बहुतांश पक्षात अनेकांना दिले जात आहे 10 तालुका अध्यक्ष 12 उपाध्यक्ष अशी काही पक्षांची परिस्थिती आहे . त्यात ज्यांना पद भेटतात ते कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यात आणि पैसे छापण्यात व्यस्त आहेत त्यांना सर्व सामान्य माणसाच्या समस्या मध्ये काहीच रस नाही . वार्डाचा विकास होऊ किवा नाही होऊ आपले घर कसे भरेल आणि दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय आपल्याला कधी भेटेल यातच ते व्यस्त असतात. आणि काही कार्यकर्ते तर आपला मतलब भगवण्या साठी सर्व सामान्य माणसात भांडणं लावताना दिसत आहे त्या मुळे पक्षाच्या वरिष्ठांनी वेळीच लक्ष देऊन कार्यवाही कारणे गरजेचे आहे कारण विकास नको पण कार्यकर्ता आवर अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे . याकडे लवकरच संगमनेरच्या सर्व पक्ष्यांनी लक्ष द्यावे असे मत संकल्प प्रतिष्ठान चे सचिव अनुप म्हाळस यांनी माध्यमांशी बोलताना मांडले हे कार्यकर्ते जनतेत कमी आणि सरकारी कार्यालयात जास्त दिसतात . तसेच वरिष्ठ नेते आले का दशक्रियाअसू का तेरावा तिथे देखील वरिष्ठांच्या पुढे पुढे करताना दिसतात .
संगमनेरमध्ये नागरिकांना योजना आणि आश्वासन नको पण कार्यकर्त्यांना आवर घालण्याची नागरिकांची मागणी

0Share
Leave a reply












