SR 24 NEWS

राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस पदी सांगलीच्या जयश्रीताई पाटील यांची नियुक्ती

Spread the love

एसआर 24 न्यूज़ प्रतिनिधी / विठ्ठल ठोंबरे  : सांगली : एका सर्व सामान्य कुटुंबातील जयश्रीताई पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला सरचिटणीस पदी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री अजित दादा पवार यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली.आज एवढी मोठी जबाबदारी मिळाली आहे. तुमचा माझ्यावर असलेल्या विश्वास , सपोर्ट, शुभेच्छा आशीर्वादामुळेच मिळाली आहे.मी सर्वप्रथम माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या माझ्याबरोबर सतत राहणाऱ्या माझ्या सर्व बंधू-भगिनींचा, वडीलधाऱ्यांचे, युवक-युवतींचे, सर्व हितचिंतकांचे आज पर्यंत मला जनतेसमोर प्रसारित करणाऱ्या आमच्या सर्व पत्रकार व मीडियाचे तसेच सर्व शासकीय, प्रशासकीय प्रशासनाचे सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानते.

 मी ही जबाबदारी एकनिष्ठेने पक्ष वाढीसाठी तसेच सर्व सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अजून मोठ्या प्रमाणात व प्रामाणिकपणे सोडवण्यासाठी घेतली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज तसेच फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचारधारा शेवटच्या श्वासापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन.आज पर्यंत मला आपण भरभरून साथ दिली अशीच साथ मला या पुढेच्याही काळात मिळावी ही अपेक्षा करते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!