राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी जिल्हा युवा मोर्चा व विविध तालुकाध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या.राहुरी तालुका भाजपच्या अध्यक्षपदी सुरेश बानकर यांची तर, जिल्हा उपाध्यक्षपदी कनगरचे अमोल भनगडे व मुळा नगरचे सुभाष गायकवाड यांची निवड करण्यात आली.
नगर दक्षिण भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी अक्षय कर्डिले यांची निवड करण्यात आली.कामगार आघाडी अध्यक्षपदी राहुरीचे गणेश राजेंद्र खैरे यांची निवड करण्यात आली. जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी राहुरी तालुक्यातून विक्रम तांबे,सुरेश बानकर नानासाहेब गागरे, संदीप गीते,रवींद्र म्हसे, युवराज गाडे, शहाजी कदम बबन कोळसे, मंदाताई डुकरे यांची निवड करण्यात आली आहे.
ब्राम्हणी गावचे युवा नेते सुरेश पंढरीनाथ बानकर यांची राहुरी तालुका भाजपा अध्यक्षपदी निवड

0Share
Leave a reply












