SR 24 NEWS

क्राईम

राहुरी फॅक्टरी परिसरात राहुरी पोलिसांची अवैध दारूविक्रीवर धडक कारवाई

Spread the love

राहुरी प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील दत्तनगर, राहुरी फॅक्टरी परिसरात अवैध दारूविक्री करणाऱ्यांविरुद्ध राहुरी पोलिसांनी मोठी कारवाई करत एका महिलेला रंगेहात पकडले आहे. आरोपी महिलेच्या राहत्या घराच्या भिंतीच्या आडोशाला बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टीची दारू साठवून ठेवण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ११:४५ वाजण्याच्या सुमारास राहुरी पोलीस ठाण्याच्या पथकाने दत्तनगर परिसरात छापा टाकला. या कारवाईत संगीता संदीप गायकवाड (वय ३६ वर्षे, रा. दत्तनगर, ता. राहुरी) हिला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून प्रत्येकी १०० रुपये किमतीचे एकूण १० लिटर गावठी हातभट्टीचे प्लास्टिक कॅन जप्त केले असून, जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १,००० रुपये इतकी आहे.

याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शेळके करीत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!