SR 24 NEWS

इतर

केंद्र -राज्य शासनाच्या विविध योजना, तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपा शिवाय पर्याय नाही – दत्ताभाऊ कुलकर्णी

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य घटकापर्यंत केंद्र शासनाच्या 55 तर राज्य सरकारच्या 44 समाज उपयोगी योजना खऱ्या अर्थाने शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपा व महायुतीशिवाय अशक्य असून जाणकार मतदारानी क्षणभंगुर विचार न करता कायमस्वरूपी विचार करून महायुतीच्या उमेदवारांना पाठबळ देऊन जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील उमेदवारांना भरघोस मताने निवडून देण्याचे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी केले.

प्रारंभी वत्सला नगर येथील हनुमान मंदिरापासून मुख्य रस्त्यावर भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत नेत्यासह कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.अणदूर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार दीपक दादा आलूरे, पंचायत समिती गणाचे रणवीर चव्हाण व चिवरी गणाचे प्रवीण भोसले यांच्या प्रचाराच्या सांगता समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना कुलकर्णी म्हणाले की, सध्या एकच भाषण अनेक ठिकाणी ऐकवले जाते. लोकांना रंजक भाषण ऐकण्याची सवय असली तरी अणदूर कराणा चिंतन करण्याची सवय आहे. कानाला बरं वाटण्यापेक्षा मनाला खरं वाटणाऱ्या विचाराची गरज असल्याचे सांगून नाव न घेता खासदार ओमराजेना टोला लगावला. मतदारानी सर्वांगीण विकासासाठी आमदार राणा दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या उमेदवारांना बिनशर्थ विजयी करण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

यावेळी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार दीपक दादा आलूरे म्हणाले की, सर्वसामान्यांच्या विश्वासावर, आदरणीय आलूरे गुरुजीं व मधुकरराव चव्हाण साहेब यांच्या सुसंस्कारातून विविध संस्थेवर काम करण्याचे संधी व प्रतिष्ठान मिळाली, मात्र तेथे जनतेची नाळ नसल्याने करमले नसल्याचे सांगून अठरा वर्षानंतर सर्व सामान्याशी नातं घट्ट करण्यासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात शेवटची निवडणूक लढवत आहोत. सुनील मालक चव्हाण यांच्या खांद्याला खांदा लावून सर्वसामान्यांच्या हितासाठी अखेरपर्यंत काम करण्याची स्पष्ट ग्वाही देऊन पद – सत्ता नसतानाही तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणा दादा पाटील यांनी भरघोस निधी देऊन काम करण्याची थाप दिल्यानेच खऱ्या अर्थाने विकासाला गती मिळाल्याचे सांगून येणाऱ्या काळात शाश्वत विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस साहेबराव घुगे, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, शहराध्यक्ष दीपक दादा घोडके, डॉ. नागनाथ कुंभार, डॉ. विवेक बिराजदार अनिल काळे यांनीही आपले मनोगत भावनिक स्वरूपात व्यक्त केले. यावेळी सुनील चव्हाण,दयानंद मुडके, बालाजी मोकाशे, अप्पू धमुरे, सचिन बिराजदार, आप्पासाहेब शेटे, विक्रांत दुधाळकर, प्रवीण घोडके, बालाजी कुलकर्णी, धनराज मुळे, पृथ्वीराज मुळे, लक्ष्मण बोंगरगे, विशाल शेटे, सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!