SR 24 NEWS

इतर

राहुरी खुर्द येथील मंदिर परिसराततुन दुचाकी चोरीस ; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

Spread the love

राहुरी प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील मंदिर परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी रवि जनार्दन गाडे (वय ४३, व्यवसाय – खाजगी नोकरी, त्रिपाआ इंडिया प्रा. लि.; मूळ रा. खालापूर, जि. रायगड; सध्या रा. देहरे टोलनाका, ता. जि. अहिल्यानगर) यांनी आपली मालकीची हिरो कंपनीची ब्लॅक हेवीग्रे रंगाची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (क्रमांक MH-16 DX 0998) राहुरी खुर्द येथील मंदिर परिसरात उभी केली होती.

गुरुवार, दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १०.३० ते शुक्रवार, दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १.४२ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने फिर्यादींच्या संमतीशिवाय, लबाडीच्या इराद्याने व स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सदर दुचाकी चोरून नेली. चोरी गेलेल्या मोटारसायकलची अंदाजे किंमत सुमारे ६० हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२१/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) अंतर्गत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ दारंकुडे करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!