प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या एका इसमावर राहूरी पोलिसांनी बुधवारी (४ फेब्रुवारी) धडक कारवाई केली. शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहूरी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल संतोष शिंदे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. गणपतवाडी, मानोरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या १०० मीटर परिसरात आरोपी नानाभाऊ तुकाराम शेलार (वय ५५ वर्षे, रा. गणपतवाडी) हा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून आरोपीकडून १७० रुपये किमतीचे ‘गायछाप’ तंबाखूचे २० पुडे आणि ९६ रुपये किमतीचे ‘रॉयल’ तंबाखूचे १२ पुडे, असा एकूण २६६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपीविरुद्ध ‘सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ उत्पादने (जाहिरात व प्रतिबंध आणि व्यापार व व्यवहार व उत्पादन पुरवठा व वितरण यांचे विनिमय) अधिनियम २००३’ (COTPA) च्या कलम ६(ब) आणि २४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी बडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मानोरीत शालेय परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर राहुरी पोलिसांची छापेमारी ; तंबाखू विक्रेत्यावर कोटपा’ कायद्यांतर्गत मोठी कारवाई

0Share
Leave a reply












