अहिल्यानगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय कारणास्तव महत्त्वपूर्ण फेरबदल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आज, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी एका अधिकृत आदेशाद्वारे चार पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या व नवीन नियुक्त्या जाहीर केल्या. जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, कायदा व सुव्यवस्था तसेच प्रशासकीय निकड लक्षात घेऊन या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने शिर्डी साई मंदिर सुरक्षा आणि महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे.
प्रमुख बदल्या खालीलप्रमाणे :
पोनि संजय जयराम सोनवणे: आश्वी पो. ठाणे येथून साई मंदिर सुरक्षा, शिर्डी (अतिरिक्त कार्यभार: बीडीडीएस, शिर्डी).
सपोनि विजय श्रीकृष्ण माळी: सोनई पो. ठाणे येथून राहुरी पो. ठाणे,
सपोनि अनिल छबु मोरे: संगमनेर शहर पो. ठाणे येथून सोनई पो. ठाणे.
सपोनि सुदाम धर्मराज शिरसाट: राहुरी पो. ठाणे येथून आश्वी पो. ठाणे.
संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने आपल्या नवीन नियुक्तीच्या ठिकाणी हजर होऊन तसा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Leave a reply













