SR 24 NEWS

इतर

खडांबे खुर्द येथे ५२ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या ; गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा

Spread the love

राहुरी प्रतिनिधी  (ज्ञानेश्वर सुरशे) : राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द येथे एका ५२ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. ५ फेब्रुवारी २०२६) पहाटे उघडकीस आली आहे. विनायक पुंजाराम पारे (वय ५२, रा. खडांबे खुर्द, ता. राहुरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे पावणे तीनच्या सुमारास विनायक पारे यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांना तातडीने वांबोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार बबन राठोड यांनी रुग्णालयात धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अ.मृ. रजि. क्र. २७/२०२६ अशी नोंद आहे.

या घटनेमुळे खडांबे खुर्द परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बबन राठोड करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!