राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरातून अज्ञात चोरट्याने सुमारे ७५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक आण्णा कोरेकर (वय ५१, रा. गणेगाव रोड, देवळाली प्रवरा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या मुलगा मंगेश कोरेकर यांच्या मालकीची काळ्या रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल (क्रमांक MH-17 DL-9047) ही राहुरी-देवळाली रोडवरील बाजारतळाजवळ पार्क करण्यात आली होती.
दरम्यान दि. ७ मार्च २०२६ रोजी पहाटे सुमारे ४.०० ते ४.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली. सकाळी वाहन जागेवर नसल्याचे लक्षात आल्यानंतर शोध घेतला असता दुचाकी सापडली नाही. त्यानंतर याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक २२४/२०२६ नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन सप्तर्षी करत आहेत.
राहुरी-देवळाली रोडवरील बाजारतळाजवळून दुचाकी चोरीस ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हादाखल

0Share
Leave a reply












