राहुरी प्रतिनिधी : गोटुंबे आखाडा येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाबाबत सध्या ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते २०० मीटर रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात २०० मीटरचे काम पूर्ण झाले नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सदर रस्ता माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या ५ लाख रुपयांच्या निधीतून करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र उद्घाटनानंतरही रस्ता अपूर्ण अवस्थेत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रस्त्याच्या मोजमापात तफावत असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला जात आहे.
स्मशानभूमीकडे जाणारा हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असल्याने नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ पाहणी करून प्रत्यक्ष मोजणी करावी, अशी मागणी केली आहे. तसेच या प्रकरणात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्वतः लक्ष घालून चौकशी करावी, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
उद्घाटन झाले, मात्र काम पूर्णत्वास गेले नाही, या कारणामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून संबंधित कामाची प्रत्यक्ष तपासणी करून वस्तुस्थिती जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे. आता या तक्रारीकडे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे कोणती भूमिका घेतात आणि सार्वजनिक बांधकाम विभाग काय कारवाई करतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
गोटुंबे आखाडा येथील स्मशानभूमी रस्त्याच्या कामात ‘गौडबंगाल’?, २०० मीटर उद्घाटन, पण काम अपूर्ण असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

0Share
Leave a reply












