SR 24 NEWS

इतर

टाकळीढोकेश्वर येथे बनाई देवी यात्रेची जय्यत तयारी,  यात्रा कमिटीचे अध्यक्ष संपतराव तराळ यांची माहिती 

Spread the love

विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : तालुक्यातील आदर्श गाव टाकळी ढोकेश्वर पंचक्रोशीतील सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असलेले जागृत देवस्थान ग्रामदैवत माता बनाई देवी यात्रा उत्सव यावर्षी मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणार असल्याची माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष संपतराव तराळ यांनी दिली आहे. 

टाकळी ढोकेश्वर परिसरातील सर्वात मोठा यात्रा महोत्सव असल्यामुळे गावातील ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या ठिकाणी भाविकांची व पाहुणेरावळ्यांची यात्रेनिमित्त नेहमीच गर्दी असते. शनिवार दि.२१ मार्च २०२६ पासून या यात्रा महोत्सवाला सुरुवात होते तर मंगळवार दि. २४ मार्च २०२६ रोजी मुक्ताई देवीच्या यात्रेने या यात्रा महोत्सवाची सांगता होते. 

गुढीपाडव्याच्या तिसऱ्या दुसऱ्या दिवशी शनिवार दिनांक २१ मार्च २०२६ रोजी फकीर शहावली बाबांचा संदल कार्यक्रम मोठ्या धुमधडाक्यात दारूगोळ्याची आतषबाजी करत यात्रेची सुरुवात होते. रविवार दि. २१ मार्च २०२६ रोजी बनाईदेवी यात्रेनिमित्त सकाळी ८.३० वा काठी मिरवणूक रात्री ७.३० वा. भव्य छबिना मिरवणूक आतिषबाजी आणि रात्री १० वा. नामवंत तमाशा कलावंत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मंगला बनसोडे सह नितीनकुमार बनसोडे करवडीकर या मराठमोळ्या तमाशा कार्यक्रमाचे आयोजन केले असून सोमवार दि. २३ मार्च २०२६ रोजी मळगंगा देवीची सकाळी ८.३० वा. काठी मिरवणूक दुपारी चार वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा, भरविण्यात येणार आहे. रात्री ७.३० वा. भव्य छबिना पालखी मिरवणूक, रात्री १० वा. नामवंत लावणी कलाकार शबनम पुणेकर यांचा फुलवंती ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर मंगळवार,दि.२४ मार्च २०२६ रोजी मुक्ताई देवीची सकाळी ८ वा. काठी मिरवणूक मुक्ताई देवीच्या यात्रेनिमित्त सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत भव्य बैलगाडा शर्यतींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

रात्री ८ वा. भव्य छबिना मिरवणूक रात्री १० वा. अमर पुणेकर प्रस्तुत नटखट सुंदरा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रमाने या ४ दिवसीय यात्रेची सांगता होते. या यात्राउत्सवचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बनाईदेवी यात्रा उत्सव कमेटीचे अध्यक्ष संपतराव तराळ, उपाध्यक्ष संजय खिलारी (मेजर), बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण पायमोडे, विवेक (सोन्या) धुमाळ, प्रशांत झावरे, अंकुश पायमोडे, मळिभाऊ रांधवण, विक्रम झावरे, बांडे मामा,विकास आल्हाट व टाकळी ढोकेश्वर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!