SR 24 NEWS

सामाजिक

देवळाली प्रवरा येथे श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रा उत्सवाचे आयोजन, १४ ते १८ मार्चदरम्यान धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल

Spread the love

देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा व परिसरातील सर्वधर्मियांचे अराध्य दैवत श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रा उत्सवानिमित्त शनिवार दि.१४ मार्च ते मंगळवार दि.१८ मार्च २०२६ या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या यात्रा उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून दानशूर मंडळी, देणगीदार व ग्रामस्थांच्या सहकार्याने यात्रेचे भव्य-दिव्य नियोजन केले आहे. यात्रा उत्सवानिमित्त शनिवार दि.१४ मार्च रोजी सकाळी १० वाजता समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन संपन्न होणार आहे.याच दिवशी सायंकाळी भाविक गंगाजल आणण्यासाठी पुणतांबाकडे रवाना होणार आहे.

रविवार दिनांक १५ मार्च रोजी सायंकाळी संगीत भजन संध्या ,सोमवार १६ मार्च रोजी सकाळी ६ वाजता बॅण्ड पथक ढोल ताश्यांच्या गजरात कावड मिरवणूक व गंगास्नान संपन्न होणार असून दुपारी ४ ते ९ वाजेपर्यंत भव्य पालखी मिरवणूक संपन्न होणार आहे. यावेळी महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते पालखी पूजन पार पडणार असून यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ होऊन बाजारतळ येथे सांगता होणार आहे. मिरवणुकीत महाराष्ट्रातील नाशिक, वैजापूर, पाटोदा , देवळाली प्रवरा यासह नामांकित बँड पथक हजेरी लावणार आहे. रात्री ९ वाजता शोभेच्या दारूची भव्य अतिषबाजी आयोजित करण्यात आली असून संगमनेर, वांबोरी व आष्टी येथील रोषणाईकार यांच्या कल्पनेतून फटाक्यांची आतिषबाजी साकारली जाणार आहे.

मंगळवार १७ मार्च रोजी दुपारी ४ वाजता कुस्त्यांचा जंगी हंगामा आयोजित करण्यात आला असून महाराष्ट्रातील नांमवंत मल्ल उपस्थित राहणार आहेत. बुधवार दिनांक १८ मार्च रोजी रात्री ९ वाजता पुणे येथील शशिकांत कोठावळे प्रस्तुत ‘पाव्हन तुम्ही म्हणाल तस’ हा लावण्यांचा कार्यक्रम पार पडणार आहे.यात्रा उत्सवात दिल्ली व अजमेर येथील रहाट पाळणे(जॉइंट व्हील) हे आकर्षण असणार आहे तसेच खाऊ व खेळणी, विविध वस्तुंची दुकाने थाटली जाणार आहे. तरी परिसरातील भाविक व नागरिकांनी यात्रा उत्सवाचा आनंद घेण्यासाठी उपस्थित रहावे असे श्री.समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रा कमिटीचे अध्यक्ष विश्वास पाटील, कार्याध्यक्ष कुणाल पाटील, उपाध्यक्ष मेजर राजेंद्र कडू, तुळशीराम कडू, उपकार्याध्यक्ष नारायण कडू, उत्तम पाटील, गणेश भांड, सचिव सुखदेव होले, शिवराम कडू, मुस्ताक शेख, भारत शेटे, सहसचिव जालिंदर मुसमाडे, धनंजय शिंदे, अनिल ढुस, यश धाकतोडे, खजिनदार दीपक पठारे, बापू कडू, राजेंद्र पोकळे, सचिन सरोदे,मंदिर व्यवस्थापनाचे गजानन येवले,रंगनाथ होले,अशोक शिंदे,भिमराज चव्हाण यांनी केले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!