राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील दरडगाव थडी येथील एका ६६ वर्षीय वृद्धाने राहत्या घरी विषारी औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भानुदास भिवा गलांडे (वय ६६, रा. दरडगाव थडी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांनी दि. ११ मार्च २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास राहत्या घरी अज्ञात कारणावरून विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने लोणी (ता. राहता) येथील पी.एम.टी. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेची माहिती मिळताच लोणी पोलीस ठाण्याचे पोलीस हवाल्दार मकासरे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.शवविच्छेदन अहवाल व प्राथमिक तपासाचे कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर दि. १३ मार्च २०२६ रोजी राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजि. नं. ४३/२०२६ (बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे) नुसार नोंद करण्यात आली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवाल्दार रामनाथ सानप करत आहेत.
राहुरी तालुक्यातील दरडगाव थडी येथे वृद्ध शेतकऱ्याची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

0Share
Leave a reply












