SR 24 NEWS

जनरल

अणदूरच्या पैलवान राहुल मुळेची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड

Spread the love

अणदूर  प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील होतकरू पैलवान राहुल मुळे याची सासवड येथे होणाऱ्या प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ग्रामीण भागातून मेहनतीच्या जोरावर पुढे आलेल्या राहुलच्या या यशामुळे अणदूर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राहुल मुळे हा अणदूर येथील जय मल्हार तालीम संघाचा पैलवान असून त्याला लहानपणापासूनच कुस्तीची आवड आहे. नियमित सराव, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर त्याने अनेक शालेय तसेच स्थानिक कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आपली छाप पाडली आहे.
त्याच्या उत्कृष्ट खेळाची दखल घेत त्याची सासवड येथे होणाऱ्या राज्यातील मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. ही निवड त्याच्या मेहनतीचे फलित मानली जात असून त्यामुळे अणदूर गावाचे नाव उज्ज्वल झाले आहे.

राहुलच्या या निवडीमुळे अणदूर गावासह परिसरातील कुस्तीप्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे. गावातील क्रीडाप्रेमी, ज्येष्ठ नागरिक तसेच जय मल्हार तालीम संघाचे पदाधिकारी व ग्रामस्थांकडून राहुलचे अभिनंदन केले जात आहे. आगामी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत राहुल मुळे दमदार कामगिरी करून यश संपादन करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!