SR 24 NEWS

सामाजिक

तमनर आखाडा येथील मुळामाई देवी मंदिरात १० मार्च रोजी कलशारोहण सोहळा – हरिकिर्तन व महाप्रसादाचे आयोजन

Spread the love

राहुरी प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथील मुळामाई देवी मंदिरात मंगळवार, दि. १० मार्च २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता कलशारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमानिमित्त विविध धार्मिक विधींसह हरिकिर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांसाठी हा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे.

या सोहळ्यास १०८ ज्ञानगिरी महाराज (मठाधिपती, अगस्ती आश्रम, अंकाई), राहुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा तथा नगरसेविका मा. डॉ. सौ. उषाताई तनपुरे, तसेच मयुरेश्वर देवस्थान, देसवंडी (तमनर आखाडा) येथील मठाधिपती ह.भ.प. योगेश महाराज शिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

कलशारोहण सोहळ्यानंतर सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत हरिकिर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे हरिकिर्तन श्री संत कवि महिपती महाराज देवस्थान, श्रीक्षेत्र ताहाराबाद येथील मठाधिपती महंत ह.भ.प. अर्जुन महाराज तनपुरे यांच्या वाणीने होणार आहे. हरिकिर्तनानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे.

या धार्मिक कार्यक्रमास परिसरातील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तमनर आखाडा येथील समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!