SR 24 NEWS

इतर

राहुरी तालुक्यातील वावरथ येथे शेतकऱ्याची मोटारसह स्टार्टर व केबलची चोरी ; अज्ञात चोरट्यांविरुद्धराहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Spread the love

राहुरी प्रतिनिधी  (ज्ञानेश्वर सुरशे ) : राहुरी तालुक्यातील वावरथ शिवारात शेतातील दोन विद्युत पाणबुडी मोटारी, स्टार्टर व केबल असा एकूण ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आबासाहेब बिरा तिखोळे (वय २१, रा. वावरथ) यांची शेती वावरथ शिवारातील गट क्रमांक ५६ व ५७ मध्ये आहे. दि. १५ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेपासून ते दि. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या शेतात प्रवेश केला.

चोरट्यांनी शेतातील सुमारे ४ हजार ५०० रुपये किमतीची ‘लक्ष्मी कंपनी’ची ५ हॉर्स पॉवरची विद्युत पाणबुडी मोटार, १ हजार रुपये किमतीचा एल.टी. कंपनीचा स्टार्टर, ५०० रुपये किमतीची केबल वायर तसेच आणखी एक ४ हजार ५०० रुपये किमतीची मोटार असा एकूण ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला.

सकाळी शेतात गेल्यानंतर साहित्य चोरीस गेल्याचे लक्षात आल्यानंतर तिखोळे यांनी तत्काळ राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक १५०/२०२६ दाखल केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रामनाथ सानप करत आहेत. परिसरात अशा प्रकारच्या चोऱ्यांच्या घटना वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!