राहुरी प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचे दि. २८ जानेवारी रोजी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याचे वृत्त समोर येताच संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती. या पार्श्वभूमीवर सोमवार दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी राहुरी तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने राहुरी येथील धनगर समाजाचे आराध्य दैवत श्री बिरोबा महाराज मंदिरात माननीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या श्रद्धांजली कार्यक्रमास राहुरी तालुक्यातील धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी माननीय अजितदादा पवार यांनी समाजासाठी तसेच राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी कचरू चितळकर, गंगाधर तमनर, रामदास बाचकर, विजयराव तमनर, ज्ञानेश्वर बाचकर, दत्तात्रय खेडेकर, आप्पासाहेब सरोदे, दत्तात्रय बाचकर, नानासाहेब जुंधारे, आप्पासाहेब तमनर, महेश तमनर, भास्कर मंचरे, भारत मतकर, कैलास केसकर, वडितके भाऊसाहेब, संतोष नजन, रावसाहेब तमनर, भारत विटनोर, शिवाजी शेंडे, अनिल माने, उमेश बाचकर, किशोर तमनर, भागवत झडे, रामु सरोदे, भिवसेन सरोदे, भारत रोकडे, संदीप तमनर, सौरभ विटनोर, अनिल डोलनर, प्रविण बिडगर, बाळासाहेब बाचकर, राम तोडमल, सुजीत तमनर आदी मान्यवर उपस्थित होते.
राहुरीत सकल धनगर समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण

0Share
Leave a reply












