SR 24 NEWS

क्राईम

राहुरी पोलीसांकडुन कत्तलीसाठी जाणाऱ्या गाईंची केली सुटका, एकूण 4,30,000/-रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

Spread the love

राहुरी प्रतिनिधी : माननीय पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर व माननीय अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ४.४५ वाजण्याच्या सुमारास राहुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ हे शासकीय वाहनाने रात्रगस्त करत होते.यावेळी रेल्वे स्टेशन रोडवरील तांदूळवाडी (ता. राहुरी) शिवारात एक संशयित महिंद्रा पिकअप गाडी भरधाव वेगाने जाताना आढळून आली. संशय बळावल्याने सपोनि शिरसाठ यांनी सदर वाहनाचा पाठलाग केला. पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच संबंधित पिकअप गाडी रस्त्यावरच सोडून चालक व त्याच्यासोबत असलेला एक इसम अंधाराचा फायदा घेत पळून गेले.

पिकअप गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये तीन मोठ्या जर्सी गाई व दोन लहान वासरे अशी एकूण पाच गोवंशीय जनावरे दाटीवाटीने व कोंबून बांधलेली आढळून आली. तत्काळ पोलीस पथकाला घटनास्थळी बोलावून गाडी व जनावरे राहुरी पोलीस ठाण्यात आणण्यात आली. या कारवाईत पाच गोवंशीय जनावरे व एक महिंद्रा पिकअप असा एकूण ४,३०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी वाहनावरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा रजिस्टर नं. ११३/२०२६ अन्वये महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा व मोटार वाहन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई माननीय सोमनाथ घार्गे (पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर), माननीय सोमनाथ वाघचौरे (अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर) व माननीय जयदत्त भवर (उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय आर. ठेंगे (राहुरी पोलीस स्टेशन) यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

या पथकात सपोनि सुदाम शिरसाठ, सफौ तुळशीदास गिते, पोहेकॉ विजय नवले, पोहेकॉ संदीप ठाणगे, चालक पोहेकॉ शकूर सय्यद, पोकाॅ जयदीप बडे व पोकाॅ नदीम शेख यांचा समावेश होता. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सफौ तुळशीदास गिते हे करीत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!