SR 24 NEWS

क्राईम

बाभुळगावचे सुपुत्र क्रीडाशिक्षक साईनाथ थोरात यांना जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार जाहीर

Spread the love

बाभुळगाव प्रतिनिधी / रावसाहेब पाटोळे : दरवर्षी प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार यावर्षी बाभुळगाव येथील प्रा. साईनाथ दत्तात्रय थोरात यांना जाहीर झाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या शुभदिनी पालक मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व ₹१०,००० रोख असे आहे.

प्रा. साईनाथ थोरात हे सारडा महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असून सायकलिंग या क्रीडा प्रकारात ते मार्गदर्शक म्हणून उल्लेखनीय कार्य करत आहेत. जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना त्यांनी उत्कृष्ट प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सायकलिंगमध्ये यश मिळवत आहेत.
ग्रामीण भागातील बाभुळगावसारख्या गावातून जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कार मिळवणाऱ्या या भूमिपुत्राचे सर्वत्र कौतुक होत आहे.शिक्षणासोबत खेळातही नैपुण्य मिळवता येते, केवळ अभ्यासाचे क्षेत्र म्हणजेच शिक्षण नव्हे, असा संदेश ते सातत्याने विद्यार्थ्यांना देत असतात.

या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाल्याने थोरात कुटुंबासह संपूर्ण बाभुळगाव गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आई-वडील, भावंडे, नातेवाईक, तसेच ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून गावचे सरपंच, चेअरमन व मित्रपरिवाराने प्रा. साईनाथ थोरात यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!