नांदेड प्रतिनिधी / धम्मदिप भद्रे : घुंगराळा, ता. नायगाव येथे पांडुरंग मेलफदवार व अनिल सुंकेवार यांच्या सुंकेवार फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सोयाबीन ऑनलाईन खरेदी केंद्राचे उद्घाटन भाजपा नेते बालाजीराव बच्चेवार यांच्या हस्ते, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. हे ऑनलाईन खरेदी केंद्र नाफेड व कृषी पणन मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यरत असून, या केंद्रामार्फत शेतकऱ्यांकडून सोयाबीनची ऑनलाईन पद्धतीने खरेदी केली जाणार आहे. यंदा शासनाने जाहीर केलेल्या ५,३२८ रुपये प्रति क्विंटल हमीभावानुसार सोयाबीन खरेदी या केंद्रातून होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
उद्घाटनप्रसंगी बोलताना बालाजीराव बच्चेवार यांनी सुंकेवार फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या कार्याचे कौतुक केले. शेतकऱ्यांच्या हितासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असून, यापुढेही कंपनीने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले. “शेतकऱ्यांना योग्य आणि जास्तीत जास्त भाव मिळावा, हा केंद्र व राज्य सरकारचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळावा, यासाठी नाफेडमार्फत खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत,” असेही त्यांनी नमूद केले. गतवर्षी या कंपनीने शेतकऱ्यांकडून ५३ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. तसेच गतवर्षीच्या हमीभावानुसार शेतकऱ्यांना वेळेत पैसे मिळवून दिले होते, अशी माहिती यावेळी देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. उपसरपंच शिवाजी पा. ढगे यांनी केले.
यावेळी घुंगराळा सोसायटीचे चेअरमन श्यामराव यमलवाड, सरपंच प्रतिनिधी गोविंदराव पांचाळ, मा. विस्तार अधिकारी बालाजीराव मातावाड, नागोराव दंडेवाड, मा. कृषी अधिकारी टी. जी. सुगावे, गजानन पा. जाधव कृष्णरकर, रुईचे मा. सरपंच गजानन पा. शिंदे, बालाजीराव वंगरवार, साईनाथ चन्नावार, पंडित पा. सुगावे, भगवान मा. पा. सुगावे, बालाजीराव तुरटवाड, लक्ष्मण चन्नावार, अशोक पा. जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष श्यामसुंदर पा. ढगे, शालेय समिती अध्यक्ष माधव पा. ढगे, ज्ञानेश्वर पा. मरवाळे यांच्यासह वंजारवाडी, सावरखेड, रुई, कृष्णर, सोमठाणा, गंगणबीड, नरंगल, हिप्परगा, पाटोदा, आंतरगाव आदी गावांतील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू आलेगटलेवार, पंढरी संदपणवार, माधवराव जलदेवार, विलास पा. सुगावे, गजानन जलदेवार यांनी परिश्रम घेतले.
नाफेड व प्रोड्युसर कंपनीमार्फत सर्व शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी होणार – बालाजीराव बच्चेवार, घुंगराळा येथे सुंकेवार फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या सोयाबीन ऑनलाईन खरेदी केंद्राचा शुभारंभ

0Share
Leave a reply












