SR 24 NEWS

जनरल

जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर सोनाली जाधव बनल्या चार्टर्ड अकाउंटंट; मानोरीत नागरी सत्कार

Spread the love

राहुरी प्रतिनिधी ( सोमनाथ वाघ) :  “जिद्द, मेहनत आणि चिकाटीची अखंड साथ ठेवली म्हणूनच चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले,” अशा भावूक शब्दांत सोनाली बाळासाहेब जाधव यांनी आपला आनंद व्यक्त केला. राहुरी तालुक्यातील मानोरी येथील कन्या सोनाली जाधव यांनी सीए परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केल्याबद्दल मानोरी ग्रामस्थ तसेच रेणुका माता देवस्थान ट्रस्टतर्फे आयोजित नागरी सत्कार समारंभात त्यांचा गौरव करण्यात आला.

या यशामध्ये आई-वडील आणि कुटुंबियांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन व मार्गदर्शन मोलाचे असल्याचे त्या म्हणाल्या. “गावकऱ्यांनी केलेल्या सन्मानाने मी भारावून गेले आहे. भविष्यातील कामकाजात ही ऊर्जा तशीच अखंड ठेवण्याचा निश्चय आहे,” असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प. संभुगिरी महाराज गोसावी होते. प्रसंगी मा. उपसभापती रविंद्र आढाव, माजी सरपंच आबासभाई शेख दयावान, बापूसाहेब वाघ, पोलीस पाटील भाऊराव आढाव, भाऊसाहेब आढाव, नवनाथ थोरात, गोकुदास आढाव सर, प्रकाश चोथे, भास्कर भिंगारे, संजय पवार, नानासाहेब तनपुरे, बाळासाहेब पोटे, बाळासाहेब कोहकडे, शरद जाधव, अंकुश जाधव, बाळासाहेब काळे, भाऊसाहेब जाधव, मुरलीधर साळुंके, संदीप पिले, चंद्रभान आढाव, शामराव जाधव, कचरू आढाव, उत्तमराव आढाव, चाँदभाई शेख, डॉ. बाबासाहेब आढाव, भाऊसाहेब गुंजाळ, नानासाहेब आढाव, निवृत्ती आढाव, रायभान आढाव, संजय शिरसाठ, संजय जाधव, दादासाहेब आढाव, डॉ. दिनेश जाधव, किशोर जाधव, रूपचंद जाधव, विक्रम जाधव, कचरू कांबळे, विठ्ठल जाधव, मधुकर भिंगारे, बबन थोरात आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!