SR 24 NEWS

इतर

पत्रकार प्रमोद दिवेकर यांना जीवे मारण्याची धमकी, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी 

Spread the love

अहिल्यानगर प्रतिनिधी / वसंत रांधवण  : माझ्या फेसबुकवर फेसबुक पोस्टला मृगजळ अशी कमेंट केली म्हणून रागाने अतिशय खालच्या भाषेत अश्लील शिवीगाळ करून तुला व तुझ्या कुटुंबाला संपवतो अशी धमकी देत थरकाप उडवणारा प्रकार पुणे शहर उघडकीस आला आहे. पारनेरचे भूमिपुत्र पुणे येथील रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते पत्रकार प्रमोद संजय दिवेकर ( वय ३६, रा. पेरणे फाटा, हवेली) यांच्यावर ही धमकी देण्यात आली असून, याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी हेमंत जाधव (रा .छत्रपती संभाजी नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

प्रमोद दिवेकर हे सामाजिकतासाठी सतत झटणारे कार्यकर्ते असून, त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील हेमंत जाधव या व्यक्तीने १६ नोव्हेंबर ला रविवारी रात्री ८ वाजता कॉल करून फेसबुक पोस्ट वर केलेल्या कमेंटची माहिती विचारली असता प्रमोद दिवेकर यांनी सविस्तर माहिती दिली.

परंतु पोस्ट वर कमेंट केलीच का?  असा राग व्यक्त करत हेमंत जाधव या व्यक्तीने फोनवर व व्हाट्सअप मेसेज द्वारे शिवीगाळ करत प्रमोद दिवेकर यांना व त्यांचा कुटुंबाला जीवे मारतो अशी धमकी देण्यात आली. या संदर्भात सदर व्यक्ती विरोधात लोणीकंद पोलीस स्टेशन येथे कलम ३५२,३५१(२)(३) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपासाचे काम पोलिस उपनिरीक्षक दिलिप पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार टि. ए. कांबळे यांच्याकडे सोपवला आहे.

या सर्व प्रकरणाच्या मागे सुतार समाज्यातील एका नेत्याचा हात असल्याचा संशय प्रमोद दिवेकर यांनी व्यक्त केला आहे. या घटनेनंतर हवेली परिसरासह पारनेर तालुक्यात संतापाची लाट उसळली असून सामाजिक कार्यकर्ते पत्रकार प्रमोद दिवेकर यांना धमकावणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी नागरिकांसह पत्रकार आणि सामाजिक संघटनांकडून जोर धरू लागली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!