तुळजापूर दि.27 चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील अणदूर परिसरात गेल्या दोन दिवसापासून पावसाची सतत धार चालू असून, दोन दिवसापासून सूर्याचे दर्शनही झाले नाही, सतत पडणाऱ्या पावसामुळे व महामार्गाच्या गलथान कारभारामुळे अनेक सखल भागात पाणी साचले असून, चिवरी पाटी परिसरात अनेक घरात पाणी शिरले आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. महामार्ग प्राधिकरण विभागातील गुत्तेदाराने तातडीने दोन्ही रस्त्याच्या बाजूने गटार व सर्विस रोड करून पाण्याचा निचरा करण्याची मागणी ग्रामस्थातून केली जात आहे.
अणदूर शहर व परिसरात गेल्या दोन दिवसापासून पावसाची रिपरिप मोठ्या प्रमाणात होत असून, थोडा वेळ थांबून,थांबून पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळत असून, शिक्षक कॉलनी तील काही रोड वर हायवेच्या गलथान कारभारामुळे पाणी शिरले आहे, सदोष गटार योजना, ओढ्याकडे पावसाचे, गटारीचे पाणी जाणाऱ्या मार्गावरील अडथळे, रोड खाली गटार वर या व अशा अनेक कारणामुळे हे पाणी कॉलनी तील रस्त्यावर तुंबले असून या मुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे, त्या मुळे ग्रामपंचायत ने वेळीच याची दखल घेऊन अणदूर स्टँड ते मलंग धाबा जवळील ओढा ही सर्व्हिस रोड वरील गटार स्वच्छ करून पाण्याचा उतार काढून द्यावा तसेच हायवे प्रशासनाने त्वरित रोड बाजूची गटार तयार करावी जेणकरून पाणी डायरेक्ट ओढ्याकडे जाईल.
या पावसाने परिसरातील ओढे, नाले भरभरून वाहात आहेत, तर सर्व छोटी, मोठी तळे,धरणे ओव्हर फुल्ल झाली आहेत खरीप पिके हातची गेली आहेत, हातातोंडाशी आलेले सोयाबीनच्या रानात गुडघाभर पाणी साचले असून, उडीद मुगाची तर आगोदर च वाट लागली आहे, तर ऊस पीक सतत पडणाऱ्या पावसामुळे आडवे पडले आहे, एकंदरीत शेतकऱ्यांना हा पाऊस म्हणजे कर्दनकाळ ठरला आहे, तर व्यापारी ग्राहक नसल्याने त्रस्त झाला आहे,
गुरुवारचा आठवडी बाजार पूर्णपणे पाण्याने धुवून निघाला आहे, प्रत्येक जण आता पाऊस बास झाला असेच म्हणत आहे, पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे, अशातच सर्दी, पडसे, खोकला,ताप यांचे रुग्ण वाढले आहेत तर लहान, लहान मुलांना श्वसनाचे आजार झाले आहेत, या सतत धार कोसळणाऱ्या पावसाचा सर्वच घटकावर अनुकूल परिणाम झाला असून आता पाऊस बास झाला असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
गटार-पाण्याचा निचरा सुलभ करावा-
महामार्ग प्राधिकरणच्या गुत्तेदाराने चिवरीपाटी ते बसस्थानक रस्त्याच्या दोन्ही बाजूतील गटारी-सर्विस रोड- पाण्याचा निचरा तातडीने करून ग्रामस्थांची होणारे गैरसोय दूर करावीअन्यथा टोलनाका बंद करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रवीणकुमार घुगरे यांनी दिला आहे.
अणदूर परिसरात मुसळधार कायम , महामार्गाच्या गलथान कारभारामुळे अनेक सखल भागात साचले पाणी

0Share
Leave a reply












