राहुरी (प्रतिनिधी) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या सर्व मागण्या तातडीने मान्य व्हाव्यात, या मागणीसाठी राहुरीतील सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवार, दि. २ सप्टेंबर २०२५ रोजी नगर–मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची माहिती देत निवेदन राहुरीच्या नायब तहसीलदार संध्या दळवी यांना देण्यात आले.
सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते सकाळी १०:३० वाजता राहुरी बाजार समितीसमोर एकत्र येणार असून यावेळी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. निवेदन देताना रवींद्र मोरे, राजूभाऊ शेटे, लक्ष्मीकांत तनपुरे, ॲडव्होकेट राहुल शेटे, ॲडव्होकेट एस.एन. तोडमल, ॲडव्होकेट सुरेश तोडमल, सचिन म्हसे, बाळासाहेब शिंदे, विक्रम गाडे, मयूर कल्हापूरे, राजेंद्र नालकर, मधुकर घाडगे, सचिन करपे, उमेश कवाने यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव उपस्थित होते.
राहुरीत २ सप्टेंबरला सकल मराठा समाजाचा रास्ता रोको आंदोलन, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा
0Share
Leave a reply












