सटाणा / विठ्ठल ठोंबरे : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल सटाणा येथे आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमात सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली सोनवणे यांनी दिंडीच्या पालखीचे पूजन करून दिंडीला सुरुवात झाली. सदर दिंडी जाधव नगर येथील श्रीकृष्ण मंदिरात नेण्यात आली. त्याप्रसंगी नर्सरीचा विद्यार्थी श्लोक कायस्थ, विठ्ठलाच्या वेशात तर सुरभी रुक्मिणीच्या वेशात, जान्हवी, भार्गवी तसेच ज्युनि. केजी.चा वैभव वारकरी वेशात, मयंक सोनवणे संत नामदेवांच्या भूमिकेत, ऋतुजा बागुल, तदनंतर इयत्ता सातवी आठवी, नववी आणि दहावी च्या मुलींनी लेझीम तर मुलांनी टाळ घेऊन अभंग गायले, दिंडी शहरातून जात असताना शाळेचे उपशिक्षक विनय सोनवणे,अविनाश वाघ, दिनेश अहिरे, दीपक जाधव, योगेश बोरसे, मनोज पाटील, जितेंद्र भामरे यांनी देखील भक्ती गीतांवर ठेका धरला. अशा भक्तिमय वातावरणात दिंडी राधाकृष्ण मंदिरात पोहोचली.
विद्यार्थ्यांनी दर्शनानंतर भक्ती गीते गायली त्यात ओवी, मेघा वरद या विद्यार्थ्यांनी गीते गायली. दिंडीचे विशेष आकर्षण संत गोरा कुंभारांचा,विठ्ठल भक्तीचा प्रसंग प्रणव देवरे व आर्या दळवी या विद्यार्थ्यांनी दाखविला.
वारकरी पेहरावात सर्व विद्यार्थी होते. शाळेच्या शिक्षिका व सेविकांनी तुळशी वृंदावन डोक्यावर घेत अभंग गायले.अश्विनी महाले सारिका कदम, हर्षिता अहिरे,वैशाली सावंत,रूपाली कुवर , जयश्री भामरे, वैशाली देवरे, शश्रद्धा निकम,दिपाली सोनवणे,हर्षदा पाटील,कल्याणी सोनवणे,वैष्णवी देवरे, माधुरी अहिरे, सपना भामरे, मोनिका जाधव तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वांनी विठ्ठल नामाचा जयघोष करत भक्तीगीते म्हटली. गोविंदराव कृष्णाजी जाधव यांच्या कुटुंबाने सर्व विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करून मोलाचे सहकार्य केले.शाळेच्या वतीने विठ्ठलाची मूर्ती देऊन त्यांचे आभार मानले. दिंडीच्या आयोजनाचे संस्थेचे सरचिटणीस मा. ॲड. श्री. नितीनजी ठाकरे, चिटणीस श्री.दिलीपजी (भाऊसा) दळवी, बागलाण तालुका संचालक श्री.प्रसाद दादा सोनवणे, महिला संचालिका-श्रीम,शालन ताई सोनवणे, तसेच शालेय समिती अध्यक्ष श्री.सुनील दादा सोनवणे, सर्व सभासद कार्यकारिणी मंडळ सर्वांनी कौतुकाचा वर्षाव केला व दिंडीचा समारोप झाला.
पांडुरंग पांडुरंग… नामाचा जयघोषात आदर्श इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी

0Share
Leave a reply












