SR 24 NEWS

क्राईम

बोधेगाव येथील मंदीरातील सेवेक-याचे शिर व धड वेगळे करून मृतदेहाची विल्हेवाट लावणा-या आरोपीस शेवगाव पोलीसांनी केले गजाआड

Spread the love

अहिल्यानगर प्रतिनीधी / वसंत रांधवण : फिर्यादी नामे- एकनाथ भानुदास घोरतळे रा. बोधेगाव ता. शेवगाव जि. अहिल्यानगर यांचे खबरीवरुन पहिलवान बाबा मंदीरातील सेवेकरी नामे नामदेव रामा दहातोंडे वय ७१ वर्षे रा. नागलवाडी ता. शेवगाव जि. अहिल्यानगर हे मिसींग झालेबावत दि.२६/०१/२०२५ रोजी शेवगाव पोलीस स्टेशनला मनुष्य मिसींग रजिस्टर नंबर- ०७/२०२५ प्रमाणे दाखल करण्यात आली होती. सदर मनुष्य मिसींग तपासा दरम्यान दिनांक-३०/०१/२०२५ रोजी पहिलवान बाबा मंदीराचे पाठीमागे असलेल्या सुशिलाबाई पाटीलबा तांबे यांचे मालकीच्या विहिरीमध्ये एक मुंडके तरंगताना दिसले. सदर मुंडके मिसींग मधील व्यक्ती नामदेव दहातोंडे यांचा मुलगा गौतम नामदेव दहातोंडे व मिसींग खबर देणारे एकनाथ भानुदास घोरतळे यांनी पाहुन ते ओळखले होते. त्यावरुन शेवगांव पोलीस स्टेशनला अ.मू.र.नं. १६/२०२५ BNSS १९४ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.

सदर तपासामध्ये दिनांक- ३१/०१/२०२५ रोजी यातील मयताचे धड/शरीर एका कोरड्या विहीरीमध्ये पुरलेले स्थितीत मिळुन आले सदरचे धड हे मयताचे नातेवाईकांनी पाहुन ते मिसींग इसम नामदेव रामा दहातोंडे यांचे असल्याचे ओळखल्याने गौतम नामदेव दहातोंडे वय ३२ वर्ष रा. नागलवाडी ता. शेवगांव जि. अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन दिनांक ३१/०१/२०२५ रोजी शेवर्गाव पोलीस स्टेशन गु.र.नं. ९१/२०२५ भा.न्या.सं. कलम १०३ (१), २३८ प्रमाणे गुन्हा रजि. दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर मा. श्री. समाधान नागरे सो पोलीस निरीक्षक शेवगांव पोलीस स्टेशन यांनी तपासाची चक्ने वेगाने फिरवून वेगवेगळी दोन पोलीस पथके बोधेगाव, बालमटाकळी, भागात रवाना करण्यात आले होते. तपास चालु असताना गोपणीय साक्षीदाराचे विश्लेषनातुन तसेच भौतीक व तांत्रिक पुराव्याचे आधारे संशयित व्यक्ती कैलास सुंदर काशिद रा. एकबुर्जी वस्ती बोधेगाव ता. शेवगाव याने मागील वर्षी नामदेव रामा दहातोंडे याने त्याच्या विरुध्द पहिलवान बाबा मुर्ती विटंबना केल्याच्या कारणावरुन त्याचे विरुध्द गुन्हा दाखल केला होता. त्याचा रोष मनात ठेवून दिनांक २६/०१/२०२५ रोजी पहाटे हत्या करुन मुंडके पहिलवान बाबा मंदीराचे पाठीमागील विहीरीमध्ये टाकून घड दोनशे मिटर अंतरावरिल असलेल्या कोरड्या विहीरीमध्ये पुरुन टाकले होते. असे तपासात दिसुन आले. त्यावरुन आरोपी नामे कैलास सुंदर काशिद यास सदर गुन्ह्यामध्ये दिनांक -०४/०२/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला सो अहिल्यानगर, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे अहिल्यानगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिल पाटील सो उपविभाग शेवर्गाव यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.श्री समाधान नागरे, सपोनि धरमसिंग सुंदरडे, सपोनि अशोक काटे, पोसई प्रविण महाले, सफौ राजु ससाणे, सफौ नाना गर्जे, पोहेका / चंद्रकांत कुसारे, पोना ईश्वर गर्जे, पोकों शाम गुंजाळ, पोकों संतोष वाघ, पोकों राहुल खेडकर, पोकाँ प्रशांत आंधळे, पोकाँ एकनाथ गर्कळ, पोका संपत खेडकर, पोकों कृष्णा मोरे, पोकों राहुल आठरे मपोकाँ प्रियंका शिरसाठ, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शेवगाव येथील पोकों अमोल ढाळे, पोकों राहुल तिकोणे तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोकों राहुल गुड्डू यांनी केली असून वरिल गुन्ह्यांचा तपास मा. श्री. सुनिल पाटील सो उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग शेवगाव हे करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!