SR 24 NEWS

इतर

श्री क्षेत्र देवगड संस्थान गुरुदेव दत्त पिठाचे महंत परमपूज्य गुरुवर्य ह.भ.प.भास्करगिरी महाराजांना मातृशोक

Spread the love

नेवासा (प्रल्हाद शिंदे) : श्री क्षेत्र देवगड संस्थान (ता. नेवासा) येथील श्री गुरुदेव दत्त पिठाचे महंत परमपूज्य गुरुवर्य ह.भ.प. भास्करगिरीजी महाराज यांच्या मातोश्री सरूबाई ज्ञानदेव पेसोडे यांचे आज रविवार दि. १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ६ वाजून १४ मिनिटांनी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय ९९ वर्षे होते. त्यांच्या पश्चात ह.भ.प. भास्करगिरी महाराज व मधुकर पेसोडे हे दोन मुले, तसेच कन्या कमलबाई रायपुरे असा परिवार आहे.

त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी ४:३० वाजता श्रीक्षेत्र देवगड संस्थान परिसरात पार पडणार आहे.सरूबाई पेसोडे यांच्या निधनाने देवगड परिसरात तसेच भक्तपरिवारामध्ये शोककळा पसरली असून, विविध स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!