SR 24 NEWS

अपघात

राहुरी विद्यापीठ कॅनॉल परिसरात भीषण अपघात; दुचाकीस्वाराला धडक देऊन अज्ञात वाहन चालक फरार

Spread the love

राहुरी प्रतिनिधी (ज्ञानेश्वर सुरशे) : राहुरी येथील विद्यापीठ कॅनॉलजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, धडक दिल्यानंतर वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी भावना नितीन ओहोळ (वय २१, रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ही घटना घडली. त्यांचे वडील सुझुकी एक्सेस कंपनीची स्कुटी (क्रमांक MH-16 CX-1084) वरून राहुरी ते अहमदनगर रोडने जात होते. दुपारी १२:०६ वाजण्याच्या सुमारास विद्यापीठ कॅनॉलसमोर अहमदनगरकडे जात असताना, समोरून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या स्कुटीला जोराची धडक दिली.

हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून स्कुटीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातानंतर संबंधित वाहन चालकाने जखमीला कोणतीही मदत न करता किंवा अपघाताची माहिती न देता घटनास्थळावरून पळ काढला.जखमीवर सध्या मॅक केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी राहुरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १३४(अ)(ब), १८४ आणि १७७ अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर २६६/२०२६ नुसार नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वैराळ करीत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!