SR 24 NEWS

इतर

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत उल्लेखनीय कामगिरीबद्दल अपर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांच्याकडून राहुरी पोलिसांचे कौतुक

Spread the love

राहुरी प्रतिनिधी : मा. अपर पोलीस महासंचालक श्री. कृष्ण प्रकाश साहेब यांनी आज दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी अहिल्यानगर जिल्ह्याच्या अधिकृत तपासणी (इन्स्पेक्शन) दरम्यान राहुरी पोलीस स्टेशनच्या टीमवर्कचे तसेच ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत केलेल्या उत्कृष्ट कार्याचे भरभरून कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

फोर्स वन व प्रशिक्षण तसेच खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबईचे अपर पोलीस महासंचालक श्री. कृष्ण प्रकाश साहेब व जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे साहेब यांनी राहुरी पोलीस स्टेशनला भेट देऊन ऑपरेशन मुस्कान अंतर्गत अपहरण झालेल्या तब्बल १०५ अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन त्यांची सुरक्षित सुटका, तसेच अपहरण करणाऱ्या आरोपींना अटक करून मुदतीत मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्याबाबत समाधान व्यक्त केले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राहुरी पोलीस स्टेशनमधील सर्व अधिकारी व अंमलदारांचे त्यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

तसेच, पोलीस स्टेशन बेलवंडी येथे कार्यरत असताना पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन टीमने बेलवंडी परिसरात विविध राज्यांतील रेल्वे स्थानकांवरून अपहरण करून वेठबिगारीत डांबलेल्या २३ वेठबिगारांची सुटका करून त्यांना गुलामगिरीतून मुक्त केल्याबाबतही विशेष प्रशंसा करण्यात आली. या मानवीय व धाडसी कारवाईसाठी श्री. संजय ठेंगे व बेलवंडी पोलीस स्टेशनच्या तत्कालीन टीमला प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.या भेटीमुळे पोलीस दलाच्या कार्यक्षमतेला व मनोबलाला बळ मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!