SR 24 NEWS

इतर

मकर संक्रांतीनिमित्त पंचगंगा शुगर अँड पॉवरतर्फे पिंपरी अवघड येथे ऊस तोडणी कामगारांना साखर वाटप

Spread the love

राहुरी प्रतिनिधी : मकर संक्रांतीच्या पावन पर्वानिमित्त पंचगंगा शुगर अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड, महालगाव यांच्या वतीने राहुरी तालुक्यातील पिंप्री अवघड येथे ऊस तोडणी कामगारांना साखर वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या सामाजिक उपक्रमामुळे ऊस तोडणी कामगारांमध्ये आनंद व समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

पंचगंगा शुगर अँड पॉवर हा साखर कारखाना चेअरमन प्रभाकरजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून, शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत पारदर्शक वजनकाटा, वेळेवर ऊस बिलांचे भुगतान तसेच शेतकरी हिताचे निर्णय यामुळे अल्पावधीतच हा कारखाना शेतकऱ्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. शेतकरी व कामगार यांच्याशी आपुलकीचे नाते जपण्यावर कारखान्याचे व्यवस्थापन सातत्याने भर देत आहे. मकर संक्रांतीनिमित्त ऊस तोडणी कामगारांच्या सन्मानार्थ साखर वाटपाचा उपक्रम राबवून पंचगंगा शुगर अँड पॉवरने आपली सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

या कार्यक्रमास पंचगंगा शुगर अँड पॉवरचे अभियंता नितेश लांबे, ॲग्री ओव्हरसीस सुनील माने, अमोल तारडे, प्रगतशील शेतकरी  कृषीभूषण रामकिसन लांबे, बाबासाहेब बाचकर, गणेश लांबे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी पंचगंगा शुगर अँड पॉवरच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत अशा सामाजिक उपक्रमांचा आवाका अधिक वाढवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!