SR 24 NEWS

सामाजिक

सुंदर गाव योजनेत अणदूर ग्रामपंचायतीचा जिल्हास्तरीय सन्मान, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव; तुळजापूर तालुक्यात प्रथम क्रमांक

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील अणदूर ग्रामपंचायतीस राज्य शासनाच्या आर. आर. आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेअंतर्गत तालुक्यात प्रथम पुरस्कार व दहा लाख रुपये पारितोषिक जाहीर झाले होते. या उल्लेखनीय यशाबद्दल अणदूर ग्रामपंचायतीचा जिल्हास्तरीय सन्मान सोहळा आज जिल्हा परिषद यशवंतराव चव्हाण सभागृहात उत्साहात पार पडला.

या प्रसंगी जिल्हाधिकारी श्री. कीर्ती किरण पुजारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मौनक घोष यांच्या हस्ते ग्रामविकास अधिकारी संजय कुमार माशाळे यांना पुष्पहार व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सरपंच रामचंद्र दादा आलूरे व ग्रामविकास अधिकारी संजय कुमार माशाळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तुळजापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून अणदूर ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात ग्रामपंचायतीचे भरीव योगदान आहे. विशेषतः कोविड-१९ सारख्या अत्यंत कठीण काळात ग्रामपंचायतीने विविध उपयोजना प्रभावीपणे राबवून जिल्ह्यात आदर्श निर्माण केला होता.स्वच्छता, नियोजनबद्ध विकासकामे, नागरिकांचा सक्रिय सहभाग व प्रशासनाशी सुसूत्र समन्वय यामुळे अणदूर ग्रामपंचायतीला हा मानाचा पुरस्कार मिळाल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या सन्मानामुळे ग्रामपंचायतीच्या पुढील विकासकामांना अधिक गती मिळणार असल्याचा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!