SR 24 NEWS

राजकीय

आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या शुभहस्ते अणदूर येथील मुख्य रस्त्याचेआज होणार लोकार्पण

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी /चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे सुमारे दोन कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या मुख्य सिमेंट काँक्रीट रस्ता व पथदिव्यांच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन सोमवार, दि. 6 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता करण्यात आले आहे. या लोकार्पण सोहळ्यास ग्रामस्थांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी सभापती अ‍ॅड. दीपक दादा आलूरे यांनी केले आहे.

अणदूर येथील बसस्थानक ते अण्णा चौक या मार्गावरील प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या या महत्त्वपूर्ण सिमेंट रस्त्याचे काम तसेच पथदिव्यांचे लोकार्पण तुळजापूर तालुक्याचे विकासाभिमुख नेतृत्व करणारे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास माजी मंत्री बसवराज पाटील, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, सुजितसिंह ठाकूर, नितीन काळे, सुनील चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या रस्ता व पथदिवे प्रकल्पामुळे गावाच्या सौंदर्यात भर पडणार असून नागरिकांना सुरक्षित व सुलभ वाहतुकीचा लाभ मिळणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजप शहराध्यक्ष दीपक दादा घोडके, धनराज मुळे, दयानंद मुडके, प्रवीण घोडके यांच्यासह कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!