तेर प्रतिनीधी / विजय कानडे : मूळचे तेर येथील रहिवासी असलेले सचिन देवकते यांनी साल 2017 रोजी राष्ट्रीय समाज पक्षात एक कार्यकर्ता म्हणून कामास सुरुवात केली याच कामाची दखल घेत राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर यांच्या कडून साल 2018 मध्ये तालुका सरचिटणीस पदाची जबाबदारी सचिन देवकते यांच्यावर सोपविण्यात आली त्यानंतर 2019 मध्ये युवक तालुकाध्यक्ष 2021 ला तालुकाध्यक्ष ते 2025 ला धाराशिव जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सचिन देवकते यांच्या हाती देण्यात आली..
सविस्तर माहिती अशी की 2021 मध्ये तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी व त्या पदावर असताना सचिन देवकते यांनी सर्व सामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रामाणिक काम केले तसेच राष्ट्रीय समाज पक्षाची विचारधारा घराघरात पोहोचविण्याचे काम केले याचीच एक पावती म्हणुन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर,प्रदेश अध्यक्ष काशिनाथ नाना शेवते , मुख्य महासचिव न्यानेश्वरजी सलगर ,मराठवाडा अध्यक्ष आश्रुबा कोळेकर यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली..
जिल्हाध्यक्ष पदी निवड होताच तानाजी पिंपळे,सतीश कसबे,रमेश लकडे,केशव सलगर,पवन माने,गणेश मस्के यांच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच देवकते यांच्या निवडीबद्दल जिल्हाभरातून कौतुक केले जात आहे..
Leave a reply













