SR 24 NEWS

राजकीय

अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हा कायदेशीर सल्लागार पदी ॲड.प्रकाश संसारे यांची नियुक्ती..

Spread the love

एसआर 24 न्यूज़ राहुरी  / जावेद शेख : जिल्ह्याच्या राहुरी येथील मा.मंत्री जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांचे कायम विश्वासू राहिलेले राहुरी येथील ॲड‌ प्रकाश संसारे यांची अहमदनगर काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या कायदेशीर सल्लागार पदी नुकतीच निवड करण्यात आली.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे व अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष बंटी यादव यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी राहुरी सह जिल्हा भरात चांगले काम केले.

पक्षाची विचारधारा शोषित वंचित आणि दुर्लक्षित घटकांपर्यंत पोहोचविली.त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना जिल्हा कमिटीवर कायदेशीर सल्लागार पदी विराजमान होण्याचा मान मिळाला.तशा आशयाचे पत्र त्यांना जिल्हाध्यक्ष बंटी यादव यांनी देउन उमेदीने काम करण्याची संधी दिली.त्यांच्या निवडीचे अभिनंदन आमदार बाळासाहेब थोरात डॉ.सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रियंका रणपिसे,संगमनेर युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयश्री थोरात, प्रदेश काँग्रेसचे महासचिव संजय भोसले,आदींनी केले त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!